सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले
नाशिक : जिल्ह्यात करोना महामारी नियंत्रणात येण्यासाठी महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणा काम करत आहेत. दिवसागणिक चिघळणारी परिस्थिती पाहता आणि रेमडेसिविर, प्राणवायू, व्हेंटिलेटर यांच्या तुटवड्यामुळे करोना रुग्णांची होणारी परवड थांबावी यासाठी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
शहर परिसरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. करोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असल्याने शासकीय रुग्णालयात खाटा, प्राणवायू, व्हेंटिलेर, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वास्तविक रेमडेसिविरविषयी संभ्रम असून नेमके काय करावे हे रुग्णांसोबत नातेवाईकांनादेखील समजत नाही. शहरात तर रेमडेसिविर इंजेक्शन सद्य:स्थितीत मिळतच नाही. मध्यंतरी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फतच रुग्णालयात इंजेक्शन मिळतील, असे नियोजन करण्यात आले. तरीही शहर परिसरात इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन आणि प्राणवायूचा पुरवठा केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. सर्वसामान्य रोग्याला एक इंजेक्शन मिळण्यासाठी वणवण करावी लागत असताना भाजपच्या लोकप्रतिनिधींना मुबलक प्रमाणात इंजेक्शन कसे मिळतात, असा प्रशद्ब्रा शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता भामरे यांनी के ला आहे. काही लोकप्रतिनिधींनी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांकडे साहजिकच इंजेक्शन मिळवून द्या, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करतात. आम्ही मात्र इंजेक्शन देण्यात हतबल ठरतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीशिवाय वैयक्तिक अथवा संघटनांना कं पनीतून इंजेक्शन देण्याचा अधिकार नाही. असे असताना या लोकप्रतिनिधींना इतकी इंजेक्शन कोणाच्या कृपेने मिळतात याचा खुलासा करत नियमांचा भंग झाला असेल तर कंपन्यांसोबत लोकप्रतिनिधींवरही कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने के ली आहे.
खासदार डॉ. भारती पवार यांनीही राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यास अतिशय कमी प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन दिले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी नाशिक जिल्ह्यात शासकीय आणिा खासगी करोना रुग्णालयात प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यात अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधले. करोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्ह्यात १० हजार इतकी मागणी असताना रविवारी केवळ ४४५ कुप्या मिळाल्या. नाशिक जिल्हावर हा अन्याय का, असा प्रशद्ब्रा त्यांनी उपस्थित के ला आहे.
केंद्र सरकारने रेमडेसिविर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांना महाराष्ट्र राज्याला चार लाख ३५ हजार इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले असताना नाशिक जिल्ह्यास तुरळक प्रमाणात रेमडेसिविर उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे काही रुग्णांना इंजेक्शनअभावी आपला जीवदेखील गमवावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसाठी तातडीने मुबलक प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.