जळगाव – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारविरोधात भुसावळ येथील युवक काँग्रेसतर्फे फैजपूर-यावल रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणला होता. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

फैजपूर-यावल रस्त्यावरील गांधी चौकात काँग्रेससह युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोदी सरकारच्या सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा – धुळ्यात चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपुलासाठी निधी मंजूर

हेही वाचा – कामयानीसह तीन एक्स्प्रेस गाड्यांना नांदगाव थांबा मंजूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मराठे यांनी राहुल गांधी यांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती अदानी यांच्यातील संबंधाबाबत, तसेच उद्योगपती अदानी यांच्या कंपनीमध्ये आलेले वीस हजार कोटी रुपये कुणाचे, असे प्रश्न उपस्थित केल्याने आगामी काळात मोदी सरकारला अडचणीत येण्याच्या शक्यतेने गांधी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सोडून दिले.