scorecardresearch

दंगली घडवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा आरोप

दंगली घडवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut allegation on bjp nashik
दंगली घडवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा आरोप (संग्रहित छायाचित्र)

नाशिक – उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांना साथ देणारे घाबरले आहेत. त्यामुळे दोन धर्मांमध्ये, जातींमध्ये तेढ निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. दंगली घडवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवरून न्याय यंत्रणेवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान झाल्याचे वाटत असेल तर त्यांनी याविरुद्ध तक्रार दाखल करायला हवी होती. परंतु, चौथेच कोणी तरी तक्रार दाखल करून न्यायालय शिक्षा सुनावते हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेतील भाषणाची संहिता आधीच तयार होती, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – नाशिक: जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ – एकाच दिवसात १८ जण संक्रमित

हेही वाचा – जळगाव: राज्यभरात ७ हजार ८९१ चिमण्यांची नोंद; निसर्गमित्र संस्थेच्या ऑनलाइन गणना मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांचे लुटलेले पैसे पचणार नाहीत. ते चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवित असले तरी मंत्रिपदाचा राजीनामा देवून त्यांनी चौकशीला सामोरे जावे, असे आवाहन राऊत यांनी केले. मालेगाव येथे अन्य काही शेतकऱ्यांची भेट घेऊन माहिती जमा करत आहे. गिरणा ॲग्रोचे पुढे काय झाले याचे उत्तरही भुसे यांनी द्यावे, असे राऊत म्हणाले.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 20:00 IST

संबंधित बातम्या