scorecardresearch

“…मग वाघाच्या जबड्यात हात घालणारे अटकेला का घाबरत होते?”; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या अटकेचा डाव रचण्यात आला, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

devendra-fadnavis-on-sanjay-raut-2
संजय राऊत देवेंद्र फडणवीस ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या अटकेचा डाव रचण्यात आला, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जुन्या भाषणांमध्ये आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालणारी लोकं आहोत, असं ते म्हणतात. मग वाघाच्या जबड्यात हात घालणारे फडणवीस अटकेला का घाबरत होते, असं राऊत म्हणाले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “तिथं तुमची सर्व सोय.. बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आला नाहीत ना?”, सुप्रिया सुळेंनी ‘ED सरकार’ म्हणत केली टीका

काय म्हणाले संजय राऊत?

“देवेंद्र फडणवीस हे सातत्याने मला अटक होणार होती, असा दावा करत आहेत. त्यांची जुनी भाषणं ऐकली तर त्यात, आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो, असे ते म्हणाले. मग एवढी हिंमत असलेली व्यक्ती अटकेला का घाबरत होती?” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मुळात फडणवीसांना कोणीही अटक करणार नव्हतं. ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला कोणी अटक करू शकतं का? खरं तर आम्ही अडीच वर्षात कधीही असे घाणेरडे कृत्यं केली नाहीत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “तिथं तुमची सर्व सोय.. बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आला नाहीत ना?”, सुप्रिया सुळेंनी ‘ED सरकार’ म्हणत केली टीका

“देवेंद्र फडणवीस हे आता कांगावा करत आहेत. ते गेली अडीच वर्ष नैराश्यात होते. त्यामुळे ते असे आरोप करत आहे. त्यांना अटक करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. साधा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. आमच्यासारखं यंत्रणांनी त्यांना बोलवलं नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे” , अशी प्रतिक्रियाही राऊत यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra News Live : “कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत ‘नोटा’चं प्रमाण वाढेल”; संजय राऊतांचा दावा

पुढे बोलताना त्यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीबाबतही प्रतिक्रिया दिली. “अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला होता. या निवडणुकीत ‘नोटा’ला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. माझ्या माहितीनुसार पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीत पुन्हा मोठ्या प्रमाणात ‘नोटा’चा वापर होणार आहे. भाजपाने नेहमीच मतदारांना गृहीत धरलं आहे. भाजपाविषयी मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. शिवसेनेविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या पुण्यातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल”, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – “तिथं तुमची सर्व सोय.. बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आला नाहीत ना?”, सुप्रिया सुळेंनी ‘ED सरकार’ म्हणत केली टीका

दरम्यान, शिवजयंतीला अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत विचारलं असता, ते कुठंही गेले तरी त्यांना शिवाजी महाराजांचे आशिर्वाद लाभणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाजारांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्यांनी अभय दिलं, त्यांचं समर्थन केलं. इतकंच नाही, तर जाता-जाता या सरकारने अभिनंदनाचा ठरावही मंजूर केला. असं असताना महाराष्ट्रातील जनता त्यांना पाठिंबा देईल, असं वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 10:19 IST