scorecardresearch

Premium

हुद्यांच्या नावात बदल केल्यास अडसर

भारतीय परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाल्यास जगातील नौदलांना प्रत्येक हुद्दयांची ओळख पटण्यात अडचणी येऊ शकतात.

change in the name of navy designation
(संग्रहित छायचित्र)

अनिकेत साठे,

नाशिक: आंतरराष्ट्रीय पातळीवर नौदलातील अ‍ॅडमिरल, रिअर अ‍ॅडमिरल, कमांडोर अशा हुद्दय़ांची (रँक) एक ओळख आहे. विशिष्ट हुद्दा अधोरेखीत केल्यावर संबंधित अधिकारी कोण, हे लक्षात येते. या हुद्दयांचे भारतीय परंपरेनुसार नामकरण झाल्यास, भाषेत बदल केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर संवादात अंतर पडू शकते, अशी शक्यता नौदलातील ज्येष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

election commission order maharashtra government to transfer ias officers who completed three years
तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे यांना आदेशाचा फटका
Tejswi Yadav Home
Bihar Floor Test : आमदार बेपत्ता झाल्याची तक्रार, पोलिसांची मध्यरात्री तेजस्वी यादवांच्या घरी धाड, बिहारमध्ये नक्की काय चाललंय?
study group report recommended many benefits for maharashtra loom owners zws 70
राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रलंबित मागण्यांना अभ्यास समितीनकडून न्याय; अनेक चांगल्या शिफारशी 
Fraud of 90 lakh by giving lure of good returns on investment
मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदल दिन सोहळयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलातील अधिकारी वर्गाच्या हुद्दयांचे (रँक) भारतीय परंपरेनुसार नामकरण करणार असल्याचे जाहीर केले. पण, अशा नामकरणाने आंतरराष्ट्रीय पटलावर नौदलास संवादात अडचणी उद्भवणार असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

हेही वाचा >>> नौदलातील हुद्यांचे भारतीयीकरण, पंतप्रधानांची घोषणा; सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

भारतीय नौदलातील हुद्दयांची नावे ब्रिटीशांच्या शाही नौदलाकडून आली आहेत. तशीच नावे भारतीय लष्कर, हवाई दलात आहेत. त्यांना ब्रिटीशांचा वारसा असला तरी यातील काही नावे, शब्द अरब, लॅटिन, फ्रेंच वा अन्य भाषेतील असल्याचा दाखला दिला जातो. अ‍ॅडमिरल हा अरबी तर लेफ्टनंट हा फ्रेंच भाषेतील शब्द आहे. 

भारतीय नौदलात अ‍ॅडमिरल अर्थात नौदल प्रमुख, व्हाईस अ‍ॅडमिरल रिअर अ‍ॅडमिरल, कमोडोर, कॅप्टन, कमांडर, लेफ्टनंट कमांडर, लेफ्टनंट, सब लेफ्टनंट अशी अधिकारी पदावरील हुद्दयांची नावे आहेत. जगातील नौदलांत प्रचलित झालेली ही पदे आहेत. प्रत्येक हुद्दयांची स्वतंत्र ओळख आहे. भारतीय परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाल्यास जगातील नौदलांना प्रत्येक हुद्दयांची ओळख पटण्यात अडचणी येऊ शकतात. समान भाषेत, समान शब्द, संज्ञा वापरूनही अनेकदा संवाद साधताना अंतर पडत असते. आपण जर या पदांसाठी वेगळी भाषा वापरल्यास संवादातील अंतर आणखी वाढण्याचा धोका असल्याचे ज्येष्ठ नौदल अधिकाऱ्याने नमूद केले.  नौदलातील खलाशी (सेलर) संवर्गात ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार सात हुद्दे आहेत. सरकारने प्रथम त्यांच्या पदांच्या नावात बदल करण्याची आवश्यकता काहींनी मांडली. लष्करात सुभेदार, हवालदार म्हटले की, सर्वांना माहिती असते ते कोण असतात. खलाशी वर्गातील हुद्दयांची नावे बदलण्याचा विचार होत असून ती बदलण्यास कुठलीही हरकत नसल्याचे अधिकारी सांगतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Senior retired navy officers expressed concern over change in the name of navy designation zws

First published on: 05-12-2023 at 05:11 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×