मालेगाव: नाशिक जिल्हा बँकेतील सात कोटी, ४६ लाखाच्या कर्ज घोटाळ्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना कायद्याच्या चौकटीनुसार अटक झाली आहे. यात पालकमंत्री दादा भुसे यांचा कवडीमात्र संबंध नसताना हिरे आणि त्यांचे समर्थक दुसऱ्यांच्या माथ्यावर हे पातक मारुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका भुसे समर्थकांनी येथे पत्रकार परिषदेत केली. कर्ज घोटाळ्यातील या रकमेची परराज्यात गुंतवणूक केली गेल्याचा आरोपही करण्यात आला.

हिरे कुटुंबियांशी संबंधित द्याने येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेला १० वर्षांपूर्वी जिल्हा बँकेकडून सात कोटी, ४६ लाखाचे कर्ज देण्यात आले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने थकबाकीची रक्कम ३१ कोटीवर गेली. या कर्ज प्रकरणात बँकेची फसवणूक केली गेली. परतफेडही न झाल्याने बँकेतर्फे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली. त्यामुळे मालेगावचे राजकीय वातावरण तापले आहे. यानिमित्ताने सत्तेचा दुरुपयोग व दबाव तंत्राचा अवलंब करत भुसे हे हिरे कुटुंबाला लक्ष्य करत असल्याचा आरोप हिरे समर्थक करत आहेत. अटक केल्यावर हिरे यांना न्यायालयात आणण्यात आले, तेव्हा न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या हिरे समर्थकांनी घोषणाबाजी केली. त्याला उत्तर देण्यासाठी भुसे समर्थकांनी द्याने येथील वादग्रस्त संस्थेच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत हिरे आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य करुन वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

हेही वाचा… छटपूजेनिमित्त रविवारी रामकुंड परिसरात वाहतुकीत बदल

सर्वसामान्य नागरिक जेव्हा बँकेत कर्ज घेण्यासाठी जातात, तेव्हा कर्ज रकमेपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता त्यांना तारण द्यावी लागते. रेणुकादेवी संस्थेस कर्ज देताना मात्र हे तत्त्व पाळले गेले नाही, असा सूर भुसे समर्थकांनी लावला. तारण दिलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन जेमतेम दीड कोटीच्या आसपास असताना प्रारंभी दोन कोटी ८० लाखाचे कर्ज दिले गेले. नंतरच्या तीन महिन्यांत पुन्हा दोन कोटी २० लाख आणि दोन कोटी ४६ लाख अशा दोन टप्प्यात आणखी कर्ज दिले गेले. विशेष म्हणजे एकच मालमत्ता तीन वेळा घेतलेल्या कर्ज प्रकरणात दाखवली गेली, याकडेही भुसे समर्थकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ही कर्ज प्रकरणे नियमात बसत नाहीत, या कारणावरून बँकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच तत्कालीन संचालक राजेंद्र भोसले यांनी त्यास विरोध केला होता. मात्र त्याला न जुमानता तेव्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले अद्वय हिरे यांनी हे कर्ज पदरात पाडून घेतले व त्यातील सात कोटीची रक्कम व्यंकटेश सहकारी बँकेत वळती केली गेली,असा आरोप भुसे समर्थकांनी केला. एकीकडे जिल्हा बँक डबघाईस आल्याने हक्काचे पैसे मिळत नाहीत म्हणून ठेवीदार त्रस्त आहेत. तसेच शेतीसाठी कर्ज पुरवठा होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट झेलण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कर्ज घोटाळ्यातील रकमेची परतफेड न होणे ही अत्यंत गंभीर बाब ठरते. तरीही हिरे समर्थक या फसवणूक प्रकरणाचे समर्थन कसे काय करतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, प्रमोद पाटील, विनोद वाघ, प्रमोद निकम, नारायण शिंदे, तानाजी देशमुख, भटू जाधव आदी उपस्थित होते.