सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : कौटुंबिक कारणातून मुलगा आणि आई यांच्यात झालेल्या भांडणात आईचा कुऱ्हाडीचे वार करत खून करण्यात आला. सुरगाणा तालुक्यातील सतखांब येथे ही घटना घडली. सुरगाणा पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.सतखांब गावातील सुभाष नगर परिसरात गावीत कुटुंबीय राहतात. सोमवारी सोनीबाई गावीत यांचा मुलगा देविदास (३७) याच्याशी त्याची पत्नी सरलाबाई हिच्यावरून भांडण झाले. संशयित देविदासने मद्यप्राशन केले होते. भांडणानंतर सोनीबाई केळीची माळी या ठिकाणी आपल्या शेतावर काम करण्यासाठी निघून गेल्या. देविदासने सायंकाळी सहा वाजता शेत गाठले. भांडणाचा जाब विचारत आई सोनीबाईच्या गळ्यावर, गालावर तसेच पोटावर कुऱ्हाडीचे घाव घातले. हा सर्व प्रकार देविदासची पत्नी सरलाबाईसमोर घडला. तिने सुरगाणा पोलीस ठाणे गाठत पतीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी देविदासला मंगळवारी ताब्यात घेतले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son killed mother over family dispute zws
First published on: 19-02-2020 at 02:37 IST