जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे त्रुटीच्या पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. त्रुटीयुक्त अर्जाचा निपटारा करण्यासाठी २८ आणि २९ मार्च या दिवशी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त तथा नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राकेश पाटील यांनी दिली आहे. 

हेही वाचा >>> नंदुरबार : १७ तासानंतरही शेतीच्या बांधांवर गारांचा खच -संपामुळे पंचनाम्यांविषयी साशंकता

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

समितीमार्फत अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई मेलवर सीसीव्हीआयएस -२ प्रणालीद्वारे संबंधित अर्जदारांना त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्यापपर्यंत ज्यांनी केलेली नाही, त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांनी त्रुटीसह आणि मूळ कागदपत्रांसह २८ आणि २९ मार्च  रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत समिती कार्यालयाच्या सुनावणी कक्षात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> घोटी, माणिकखांब रेल्वेव्दार दोन दिवस बंद

राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया अंतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचे अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर मूळ कागदपत्र अपलोड करून ऑनलाईन अर्ज करावा. तसेच ऑनलाईन अर्ज, शपथपत्र व अपलोड केलेल्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असेही पाटील यांनी कळविले आहे.