जळगाव – ठेकेदारीची देयके निघत नाहीत, रस्त्यांची कामे होत नाहीत यांसह इतर विकासकामांना अडथळा येतो म्हणून प्रशासनाला दोषी धरून आयुक्तांविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत अविश्वास ठराव विशेष महासभेत आणण्याचे ठरविले आहे. आपल्या नाकर्तेपणाचे खापर दुसर्याच्या माथी फोडण्यासाठी नगरसेवकांचा हा खटाटोप असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. त्याबाबतचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले आहे.

पावणेपाच वर्षांपासून नगरसेवकांच्या काळात शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. तेव्हा कोणत्याही नगरसेवकाने त्याविरुद्ध आवाज उठविला नाही. महापालिकेचा पाच वर्षांचा भ्रष्ट कारभार पाहता, मतदार कोणत्याही नगरसेवकाला दारात उभे करणार नाहीत. खड्ड्यांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले, तेव्हा ढोंगी नगरसेवक कुठे होते, असा प्रश्नही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>सिन्नरला बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसंघर्ष मोर्चा, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, संविधान जागर समिती, भीम-रमाई प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन शिक्षक संघटना, अनुसूचित ठाकूर जमात सेवा मंडळ, शक्ती जनसेवा फाउंडेशन, भीम सेना, भीम आर्मी, धनगर समाज कर्मचारी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, आदिवासी एकता परिषद, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, छावा मराठा युवा महासंघ, भिल्लवंश संघटना, सत्यशोधक समाज आदी संघटनांनी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना पाठिंबा दिला आहे.