नाशिक – घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर घरफोडी करणाऱ्या १० जणांच्या आंतरराज्य टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझातून रोख रक्कम व अन्य काही सामान असा दोन लाख ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. दोन महिन्यात याच पद्धतीने इगतपुरी, घोटी परिसरात हॉटेल, वाईन दुकानांमध्ये घरफोड्या करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर, नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गंभीर तसेच नाउघड गुन्ह्याचा आढावा घेत गुन्हे उघडकीस आण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना देण्यात आल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी घरफोडीचे गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून माहिती घेतली असता नाशिक आणि मालेगावमध्ये घरफोडी करणारे काही सराईत गुन्हेगार जामिनावर सुटले असून सध्या क्रियाशील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली असता नाशिक शहर परिसरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन कुट्टी (४५, रा. ओटवरम, सध्या पेठरोड, नाशिक) याला तीन दिवस पाळत ठेवत ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता घोटी, इगतपुरी, चाळीसगाव, राहुरी, दिंडोरी परिसरात १० घरफोड्या केल्याची कबुली दिली.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचा – पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस

पोलिसांनी हसन कुट्टीसह त्याचे साथीदार दिलीप जाधव (२३), अनिल डावर (२६) दोघे रा. फुलेनगर, पंचवटी, मुस्तफा अन्सारी (२५, रा. चाळीसगाव फाटा), सय्यद जहुर (४२, रा. अन्सारगंज), सईद शेख उर्फ सईद बुड्या (३४, रा. जमहुर नगर), मोहम्मद सत्तार (३८, रा. अख्तराबाद), सय्यद अन्वर (४०, रा. आयशानगर), हनिफ खान (३२, रा. जमहुर कॉलनी), शेख तौफिक उर्फ पापा फिटींग (२६, रा. नुमानीनगर) या मालेगावमधील संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा – नंदुरबार : एका आरोग्य केंद्रातून दुसऱ्या केंद्रात पाठवणी, बंद रुग्णवाहिकेतच प्रसुती, अन…

हसन कुट्टीवर घरफोडीचे ३२ गुन्हे दाखल असून त्यापैकी सात गुन्ह्यांमध्ये त्याला दोषसिद्धी झाली आहे. तसेच तौफिक शेख हा मालेगावातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील सर्व संशयित हे आंतरराज्य गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा तयारी, घरफोडी, चोरी असे गुन्हे दाखल आहेत. कुट्टी नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटल्यावर साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे सत्र त्याने सुरू केले होते. संशयितांकडून विदेशी मद्य, मोटार सायकल, भ्रमणध्वनी तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहने असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.