धुळे: धुळे जिल्ह्यातील साक्री येथून पाच ते सात दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने, चांदीच्या दागिन्यांसह अपहरण केलेल्या युवती युवतीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

साक्री येथील विमलबाई महाविद्यालयाच्या पाठीमागे दौलत बंगल्यात २५ नोव्हेंबरच्या रात्री साडेदहा वाजता चार ते पाच दरोडेखोर चेहरा कापडाने झाकून शिरले. त्यांच्याकडे बंदूक आणि चाकू असे शस्त्र होते. घरातील ज्योत्स्ना पाटील (४०) यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत घरातील सोने,चांदीच्या दागिन्यांसह ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

हेही वाचा… कन्नड घाटात धुक्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, अन….

ज्योत्स्ना यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांचे हात-पाय आणि तोंड कापडाने बांधले. यावेळी घरात ज्योत्स्ना यांची २३ वर्षाची भाची निशा शेवाळे (रा. आदर्शनगर, साक्री) ही होती. दरोडेखोरांनी हत्यार रोखत दमदाटी करुन तिला ताब्यात घेत पळ काढला. दरोडेखोर गेल्यावर ज्योत्स्ना यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांनी दरोडेखोरांच्या तपासासाठी चौफेर नाकेबंदी केली. युवतीच्या शोधासाठी चार पथके स्थापन केली. अखेर रविवारी सायंकाळी अपहरण झालेली युवती सेंधवा (मध्य प्रदेश) येथे पोलिसांना सापडली. युवती सापडल्याने तिच्या नातेवाईकांनी श्वास टाकला.