scorecardresearch

Premium

सिन्नरमधून तीन बाल कामगारांची सुटका

सिन्नर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे.

Three child laborers rescued from Sinnar
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बालकामगारांना बालगृहात पाठवले आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : सिन्नर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बालकामगारांना बालगृहात पाठवले आहे.

two cars transporting ganja caught by solapur rural police
सोलापूरजवळ गांजा तस्करी पकडली; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
two arrested for stealing gold chains from women's necks in sangli
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणाऱ्या दोघांना अटक
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
NAMO Drone Didi Scheme
पंजाबच्या ‘ड्रोन दीदी’, ग्रामीण भागातील महिलांना मिळालं उत्पन्नाचं नवं साधन! जाणून घ्या ‘या’ योजनेविषयी

सिन्नर बस स्थानक परिसरात आई सप्तश्रृंगी वडापाव सेंटर हे सुदर्शन नाईक यांचे छोटे दुकान आहे. या ठिकाणी १३ वर्षांचा बालक हा काम करत असल्याची तक्रार कामगार उपआयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत संबंधित बालकामगाराची सुटका करण्यात आली. संबंधित बालकाला कमी वेतन देत त्याच्याकडून जादा श्रमाचे काम करून घेतले जात होते. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नाईक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-इगतपुरीतील शेती नुकसान पाहणी दौऱ्यात विनायक राऊत यांची टीका; म्हणाले, “सरकार पळपुटे…”

सिन्नर येथील पंचवटी मोटेल्स उडपी तडका येथे काम करणाऱ्या दोन बालकामगारांचीही सुटका करण्यात आली. त्यात नेपाळ येथील १३ वर्ष पाच महिने वयाच्या आणि १२ वर्ष, पाच महिने, आठ दिवस वयाच्या बालकांचा समावेश आहे. सिन्नर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयित सुरेश पुजारी, रवीश मुल्की यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three child laborers rescued from sinnar mrj

First published on: 29-11-2023 at 18:38 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×