घरफोडय़ा करून लाखोंचा ऐवज लांबविणाऱ्या दोन सराईतांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या अटकेने मुंबई नाका, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्ह्य़ांची उकल झाली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण वाघमारे (तिडके कॉलनी) आणि राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (भद्रकाली) अशी या संशयितांची नावे आहेत. युनिट एकचे जमादार चंद्रकांत पळशीकर यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. घरफोडीच्या गुन्ह्य़ात पोलिसांना गुंगारा देणारे संशयित मंगळवारी अमरधाम रस्ता परिसरात येणार असल्याच्या माहितीवरून युनिटचे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला होता. संशयित येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संशयितांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अशोका मार्गावरील ड्रीम पार्क सोसायटीत झालेल्या घरफोडीसह पंचवटीतील दोन गुह्यांची कबुली दिली. संशयितांच्या ताब्यातून एक लाख ५६ हजार ३६८ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three crimes of burglary in nashik
First published on: 24-03-2018 at 02:33 IST