व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे

नाशिक : जिल्ह्य़ात व्यापारी, दलाल यांच्याकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे सत्र सुरूच असून शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या नवीन तीन घटनांची नोंद करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्य़ात भौगोलिक सुखसंपदा मोठय़ा प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांकडून अनुकू ल हवामानाचा वापर करत मोठय़ा प्रमाणावर हंगामानुसार पिके  घेतली जातात. त्यांनी कष्ट करून शेत शिवारात उभे के लेले पीक व्यापारी, दलाल विक्रीच्या माध्यमातून खरेदी करतांना ठरलेला व्यवहार पूर्ण न करता शेतकऱ्यांची फसवणूक करतात. नाशिक विभाग परिक्षेत्राचे  विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रदीप दिघावकर यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रोरींची तातडीने दखल घेण्याची सूचना डॉ. दिघावकर यांनी दिल्यानंतर जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढू लागले.

मालेगाव तालुक्यातील कोठरे गावातील मदनसिंग मगर यांनी संशयित अजयसिंग ठाकू र (रा. अहमदनगर) याच्याशी डाळिंब पिकासंदर्भात व्यवहार के ला. मगर यांच्या शेतातील १५ टन डाळिंब ठाकू रने खरेदी करत कोटक बँके च्या शाखेचा धनादेश दिला. मगर हे धनादेश वटविण्यासाठी गेले असता ठाकू रच्या खात्यात रक्कम शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले.

याविषयी पाठपुरावा के ला असता उडवाउडवीची उत्तरे सातत्याने देण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मगर यांनी वडनेर खाकु र्डी पोलीस ठाण्यात तक्रोर दिल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या घटनेत बागलाण तालुक्यातील ठेंगोडे येथील

निंबा अहिरे यांनी निफाड तालुक्यातील लासलगांव येथील संदीप गायकर, मधुकर गायकर यांच्याशी कांदा बियाण्यासंदर्भात व्यवहार के ला. गायकर यांनी अंदाजे ६८ हजार २५० रुपयांचे ३३ किलो कांदा बियाणे अहिरे यांना विकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहिरे यांनी बियाणे शेतात टाकल्यानंतर ते उगवले नाही. या फसवणुकीविरुद्ध लासलगांव पोलीस ठाण्यात तक्रोर के ल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गायकरने याच पद्धतीने संजय सोनवणे (रा. ठेंगोडे) यांना ३० किलो किं मतीचे कांदा बियाणे (अंदाजे किं मत ७५ हजार रूपये) विकले. हे बियाणे शेतात उगवले नाही. त्यामुळे गायकरविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रोर दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.