नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.पंकज देशमुख (२०, रा. जोपुळ रोड) हा गतीमंद युवक काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो चिंचखेड चौफुली येथे पाटाच्या पाण्यात पडलेला मिळून आला. त्याला पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना कळवण तालुक्यात घडली. योगेश मार्कंड हा भेंडी शिवारातील पाझर तलाव येथे मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरल्याने तलावात पडला. बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.