नाशिक जिल्हा परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवकांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नितीन शिंदे (२१) आणि राजेंद्र बर्डे (१७, रा. दोडी) असे दोन मृत युवकांचे नाव आहे.

हेही वाचा- नाशिक : मालेगावच्या रेणुकादेवी सूतगिरणीची मालमत्ता विक्रीला; संचालकांविरोधात फौजदारी कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोंदे दुमाला येथील नितीन शेतातील मोटारीच्या पाईपची दुरूस्ती करत असतांना पाय घसरुन विहीरीत पडला. नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत राजेंद्र हा पहाटे शौचास गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. प्राथमिक शाळेच्या आवारातील विहिरीत नातेवाईकांना राजेंद्रची चप्पल तरंगतांना आढळली. सिन्नर अग्निशमन दलाने विहीरीतून राजेंद्रला बाहेर काढले. दोडी ग्रामीण रुग्णालयात त्याला आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.