लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : लोकसभेच्या ४८ जागा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता महाराष्ट्र आठवत आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यात फेऱ्या वाढल्या आहेत. मणिपूरमध्ये केवळ दोन जागा असल्याने ते तिकडे गेले नाहीत. महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळासारखी संकटे आली. तेव्हा ते आले नव्हते. महाराष्ट्राने आर्थिक मदत मागूनही दिली नव्हती. मोदींकडून देश आणि गुजरात यामध्ये भिंत उभी केली जात आहे. देशातील हिंदुंमध्ये भेदभावाचे विष कालवले जात असून ते अतिशय घातक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की
Beed Lok Sabha
बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग
sharad pawar rohit pawar chandrakant patil
“भाजपाचं लक्ष्य स्पष्ट, पण बंदूक अजित पवारांच्या खांद्यावर”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचा पलटवार

येथे ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाशिबीर झाल्यानंतर सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभास्थळी अंबाबाईच्या गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ठाकरे यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटाला लक्ष्य केले.

हेही वाचा >>>“वहिनी आता बाहेर पडायची वेळ आलीय”, भास्कर जाधवांचं रश्मी ठाकरेंना भावनिक आवाहन; म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत येथील इंग्रजांची वखार लुटली होती. पण मोदी आणि शहा महाराष्ट्राला लुटत, ओरबाडत आहेत. महाराष्ट्र ओरबाडला जात असताना भाजपला राज्यातील सत्तेसाठी साथ दिलेले काहीच करत नाहीत असा आरोप ठाकरे यांनी केला.

रश्मी ठाकरे यांना जाधव यांचे आवाहन

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर संपूर्ण भाषण केले. आपल्या माणसांवर अन्याय, आरोप होत असताना, चिखलफेक होत असतानाही त्या जराही डगमगल्या नाहीत. त्या चंद्राप्रमाणे शांत आहेत. आता घरात बसायचं नाही, आता बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले. जाधव यांचे भाषण सुरु असताना रश्मी ठाकरे भावूक झाल्या होत्या.