जळगाव – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २३ एप्रिलला जिल्हा दौर्‍यावर येणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. ठाकरे यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पाचोरा येथे शनिवारी (१५ एप्रिल) लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली.

ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसेच इतर शिवसेना नेते व पदाधिकारी राहणार आहेत. पाचोरा येथे माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण, मायकोरायझा प्रयोगशाळेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. ठाकरे यांच्या जिल्हा दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय बैठक पाचोरा येथील अंतुर्ली फाटा भागातील निर्मल सीड्स कंपनीनजीक बोहरी फार्म येथे दुपारी तीनला होणार आहे.

हेही वाचा – जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच असहकाराचे धोरण

जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी-पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहपौर कुलभूषण पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, दीपकसिंग राजपूत, प्रा. समाधान महाजन, महिला संघटक महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा – दादा भुसेंची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, राहुल गांधींशी तुलना करत म्हणाले, “छोटे युवराज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीला ठाकरे गटाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले आहे.