बोईसर: पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित महायुतीचा  भगवा फडकवण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोर येथे आयोजित शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केला. शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जिल्ह्यातील सर्व उपनेते आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, युवासेना व महिला आघाडी यांची महत्वपूर्ण बैठक पालघर जिल्हातील मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे संपन्न झाली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना शिवसेना हा पक्ष संकटकाळात सर्वप्रथम  मदतीसाठी मैदानात उतरतो. सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटू न देता त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहण्यास शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.  जगात असा एकच नेता आहे की जो कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्यावर आनंद व्यक्त करत आहे असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. कार्यकर्ते घडवायला खूप वेळ लागतो, पण गमवायला वेळ लागत नाही. आता निवडणूक आहे. कार्यकर्ता हाच आपला पाया आहे. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. म्हणून नेत्यांनी कार्यकर्त्यांकडे पाहावं असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

शिवसेना पक्षाच्या पुढील कार्य योजनांबाबत  जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बांधणी, आगामी उपक्रम आणि पक्ष विस्ताराच्या संधी याबाबत शिंदे यांनी संवाद साधला.  आगामी रक्षाबंधन सणानिमित्त शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना राखी बांधून लाडकी बहिण योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मनोहर येथे आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला  संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, निरीक्षक पांडुरंग पाटील, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, कुंदन संखे, वसंत चव्हाण,  निलेश तेंडोलकर, उपनेत्या ज्योती मेहेर, उपनेते निलेश सांबरे,  जगदीश धोडी, प्रवक्ते राजेश शहा, सहसंपर्कप्रमुख केदार काळे, प्रभाकर राऊळ,  वैभव संखे, संपर्क संघटिका भारती गावकर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण,  वैष्णवी राहणे,  लक्ष्मी चांदणे, माजी आमदार मनीषा निमकर, श्रीनिवास वनगा,  अमित घोडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी, युवा सेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष कुणाल पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष सौरभ आप्पा व इतर प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.