03 March 2021

News Flash

सुरक्षा चाचणीवर मदार

मध्य रेल्वेने उरणला उपनगरीय रेल्वे मार्गाने नवी मुंबईशी जोडले जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतरच नेरुळ-खारकोपर सेवेला मुहूर्त

मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण या उपनगरीय मार्ग प्रकल्पातील नेरुळ ते खारकोपपर्यंतचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न असून मंगळवारी (ता. ३०) होणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयोगाच्या चाचणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतरच हा टप्पा सेवेत येणार आहे.

मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून रेल्वे सुरक्षा आयोगाची या मार्गावर पाहणी होणार आहे. यांच्यासमवेत सिडको रेल्वे प्रकल्पाचे मुख्य अभियंता व इतर अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

मध्य रेल्वेने उरणला उपनगरीय रेल्वे मार्गाने नवी मुंबईशी जोडले जाणार आहे. त्यासाठी १९९७ सालापासून हा प्रकल्प हाती घेतला. २० वर्षे उलटूनही हा मार्ग सुरू होऊ शकला नाही. हार्बर व ट्रान्स हार्बर प्रवाशांकडून या नवीन मार्गासाठीची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पात प्रत्यक्षात रेल्वे बोर्डानेही लक्ष घातले व यातील नेरुळ ते खारकोपपर्यंतचा पहिला टप्पा त्वरित सेवेत आणण्याचे आदेशही दिले. भविष्यात नवी मुंबई विमानतळही होणार असल्याने हा प्रकल्प महत्त्वाचाही मानला जातो.

या मार्गावर गेल्या आठवडय़ात वेगाची चाचणी यशस्वी झाली. यापूर्वी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी हा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देत रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतरच तो सेवेत येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आज होणाऱ्या या सुरक्षा चाचणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

डिसेंबर २०१७, त्यानंतर मे २०१८ आता दिवाळीचा मुहूर्त साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरघर या स्थानकातील कामामुळे या मार्गाला विलंब लागला.

या मार्गामुळे उलवे नोड हार्बर मार्गाशी जोडला गेल्यामुळे वाहतुकीतील अडचणी संपणार आहेत. आज या परिसरात राहणाऱ्यांना रेल्वेने मुंबईकडे प्रवास करण्यासाठी बेलापूर, नेरुळ, सीवूडसला बस, रिक्षा खासगी गाडय़ांनी यावे लागते. त्यामुळे हा मार्ग सुरू झाल्यास प्रवाशांची मोठी अडचण सुटणार आहे. या मार्गावर १० स्थानके आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात नेरूळ ते खारकोपर हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.

४ नोव्हेंबरचा मुहूर्त?

नेरुळ-खारकोपर या मार्गावरील रेल्वे ४ नोव्हेंबरला सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे उलवे नोड व परिसरातील नागरिकांना ४ नोव्हेंबरच्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे.

१२ किलोमीटर अंतर हे सीवूडस् ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे असून पुढे खारकोपर ते उरण हे अंतर १५ किलोमीटर आहे. एकूण २७ किलोमीटरच हा प्रकल्प आहे. ६७ टक्के सिडकोकडून व रेल्वेकडून ३३ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे.

रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत मंगळवारी या मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीवरच दिवाळीत रेल्वे सुरू होणार का नाही हे निश्चित होणार आहे.

– एस.के.चौटालिया, सिडको रेल्वे प्रकल्प मुख्य अभियंता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 3:02 am

Web Title: after approval of railway safety commissioner nerul kharkopars service will be started
Next Stories
1 बीट चौकी उघडली, पण उद्घाटनापुरतीच
2 कोकण भवन परिसरातील वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर
3 करंजा बंदराची प्रतीक्षा संपणार
Just Now!
X