कांदा दर २५ ते २७ रुपये प्रतिकिलो

नवी मुंबई : गेली अनेक दिवस कांदा दरांमुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येत होते. मात्र आता कांद्याचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली असून नवीन कांदा २५ रुपये किलो तर जुना कांदा २५ ते २७ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला आहे. बाजारात  ऑगस्ट अखेरपासून कांद्याच्या दरात सत्तात्याने वाढ झालेली पाहावयास मिळत होती. एपीएमसी घाऊक बाजारात अतिवृष्टीच्या कलावधीत कोणताही परिणाम जाणवला नव्हता, मात्र त्यांनतर पावसाने भिजेलला कांदा दाखल होत असल्याने आवक घटली होती. पावसाने नवीन

कांद्याचा हंगामदेखील लांबणीवर पडला होता. त्यामुळे घाऊक बाजारात कांदा दर ७० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ते १०० रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे कांदा आयात करण्यात आल्याने कादा दर आटोक्यात आले होते. मात्र किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने कांदा विकला जात होता. त्यामुळे ग्राहकांना कांदा परवडत नव्हता.

आता बाजारात नाशिक, पुणे येथील नवीन कांदा आवक वाढली आहे. बाजारात आता कांद्याच्या १०० गाड्या दाखल होत असून त्यात २५ टक्के नवीन कांदा आवक होत आहे. यावर्षी अतिवृष्टिमुळे कांद्याचे  ६० टक्केच उत्पादन झाले आहे. मात्र सद्या आवक वाढल्याने घाऊक बाजारात कांदा २५ ते २७ रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत आहे.