04 March 2021

News Flash

आपटा एस.टी. मधील बॉम्ब निकामी करण्यात रायगड पोलिसांना यश

बुधवारी रात्री ११ वाजल्यापासून आपटा गावांमध्ये बॉम्बची सदृश्य वस्तूची चर्चा सुरू होती.

कर्जत आपटा वस्ती एसटी बसमध्ये बाँम्बसदृश्य वस्तू सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.  एस.टी. मधील बॉम्ब निकामी करण्यात रायगड पोलिसांना यश आल्याची माहिती मिळाली आहे.  बॉम्बची माहितीमिळाताच पोलिसांनी तात्काळ आपटा गावाकडे कूच केली होती. पोलीसांनी घेराव केल्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते.

बुधवारी रात्री ११ वाजल्यापासून आपटा गावांमध्ये बॉम्बची सदृश्य वस्तूची चर्चा सुरू होती. रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच बॉम्बशोधक पथकही अलिबागहून लगेच आले. त्यानंतर बाँम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आले.  बाँम्ब सदृश्य वस्तू पाहण्यासाठी आपटा गावातील नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 7:02 am

Web Title: bomb like suspicious things found in st bus
Next Stories
1 पुन्हा आयुक्त विरोधी सत्ताधारी
2 कर्नाळय़ाजवळ अपघातात पती-पत्नी ठार
3 आयुक्तांविरोधात सत्ताधाऱ्यांची चाल?
Just Now!
X