लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर एलपी उड्डाणपुलावर एका कारला अचानक लागलेल्या आगीत कार खाक झाली. गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.
कारला आग लागताच प्रसंगावधान राखत चालक बाहेर पडला. त्यानंतर कारने पेट घेतला. विरुद्ध दिशेने अग्निशमन दलाचे पथक येत त्यांनी आग विझवली. अर्धा तास पुलावरील वाहतूक ठप्प होती. त्यानंतर उड्डाणपुलावर जाणारी वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली. त्यामुळे त्या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करीत दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 4, 2020 3:28 am