लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : मार्चच्या पहिल्या दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांना करोना प्रतिबंधक लस दिली जात असून सोमवारी पहिल्याच दिवशी खारघर येथील टाटा रुग्णालयात ४० हून अधिक जेष्ठांनी हजेरी लावली. मात्र दुपापर्यंत लसीकरणबाबत कोणतीही सूचना न आल्याने त्यांना लस देण्यात आली नाही. अनेक तास या ठिकाणी रखडपट्टी करावी लागल्याने ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला.

सोमवारी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न देता परत पाठविण्यात आले. या नियोजनामुळे अनेकांचा रुग्णालय व्यवस्थापनाशी वाद झाला.

ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू झाले असले तरी सरकारच्या ‘अ‍ॅप’वरील काही तांत्रिक अडचणींमुळे संबंधित रुग्णालयाच्या संकेतस्थळावर जोपर्यंत तपशील येत नाही तोपर्यंत लस देता येत नाही. ज्यावेळी लसीकरण सुरू होईल तेंव्हा पालिका प्रशासन हा कार्यक्रम जाहीर करेल. त्यानंतरच नागरिकांनी लसीकरणासाठी यावे.

-डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल पालिका