X
X

यंदा कापडी मखरांत गणेशाचे आगमन

READ IN APP

गणरायाला आरास करण्यासाठी बाजार सध्या विविध वस्तूंनी सजला आहे. यात पडद्याच्या मखरांची मागणी जास्त आहे.

सीमा भोईर

प्लास्टिकसोबत थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्याने यंदा कापडी मखरांची मागणी वाढली आहे. सध्या पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कळंबोली आणि कामोठे येथील बाजारपेठा पर्यावरणपूरक मखरांनी सजल्या आहेत.

१३ सप्टेंबर रोजी गणेशाचे घरोघरी आगमन होईल. गणरायाला आरास करण्यासाठी बाजार सध्या विविध वस्तूंनी सजला आहे. यात पडद्याच्या मखरांची मागणी जास्त आहे.

यंदा मखराच्या सजावटीसाठी विविध कल्पना आकाराला येत आहेत. पडद्यांच्या झालरी, कमानी, छत आणि झुंबरांना विशेष मागणी आहे. घडीचे मखर हे यंदाचे आकर्षण आहे. ६०० ते अडीच हजार रुपयांपर्यंतचे विविध नक्षीदार पडदे बाजारात उपलब्ध आहेत. कापडी मखर सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत, असे पनवेलमधील व्यापाऱ्यांनी सांगितले. कापडी मखर हाताळण्यास सुलभ आहेत. ते धुऊन पुन्हा वापरता येतील. कापडी मखरांना विविध सजावटीच्या झालरी लावण्यात आल्या आहेत. या मखरांमध्ये सॅटिन कापडाचा वापर करण्यात आल्याची माहिती मखर विक्रेते राजेश साटम यांनी दिली.

पनवेल बाजारात विक्रीसाठी ठेवलेले विविधरंगी कापडी मखर.

23
X