News Flash

सिडकोकडून ग्रामदेवतांचीही पुनर्स्थापना

कोपर गावातील श्री स्वयंभू चिंतामणी मंदिराचे उद्घाटन

कोपर गावातील श्री स्वयंभू चिंतामणी मंदिराचे उद्घाटन

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात विस्थापीत झालेल्या कोपर गावातील श्री स्वयंभू चिंतामणी मंदिराची उभारणी सिडकोकडून करण्यात आली असून सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक बाधित गावातील ग्रामदेवतेच्या मंदिर उभारणीसाठी सिडकोने एक कोटी रुपये निधी दिला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोने पनवेल तालुक्यातील दहा गावे विस्थापित करून त्यांची ६७१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. या प्रकल्पग्रस्थांना दिलेल्या सर्वोत्तम मोबदल्यानंतरही काही प्रकल्पग्रस्त नाराज होते. त्यांची नाराजी दूर करताना सार्वजनिक सेवा आणि सुविधांचे तसेच धार्मिक स्थळांचे गावात असलेल्या भूखंडांनाही पर्यायी भूखंड देण्याची मागणी सिडकोने मान्य केली. यात प्रत्येक गावात असलेल्या विविध धार्मिक स्थळांसाठी भूखंड देण्यात येईल, असे आश्वासन सिडकोच्या वतीने देण्यात आले होते. यातील प्रमुख ग्रामदेवता मंदिर उभारणीसाठी एक कोटी बांधकाम खर्चदेखील देण्याची प्रकल्पग्रस्तांची अट सिडकोने मान्य केली आहे. त्यानुसार कोपर गावातील श्री स्वयंभू चिंतामणी मंदिरासाठी सिडकोने पुष्पकनगर या प्रकल्पग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या नोडमधील सेक्टर आर ४ वर हे मंदिर १५ फेब्रुवारीच्या माघी गणेशोत्सवपूर्वी बांधून पूर्ण करण्यात आले असून सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल हेदेखील उपस्थित होते. या लोकार्पणासाठी कोपर गावातील प्रकल्पग्रस्त व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न सोडविताना त्यांच्या धार्मिक भावनांची जपणूक करणे हे सिडकोचे कर्तव्य आहे. त्याच उद्देशाने सिडकोने कोपर गावातील श्री गणेश मंदिराची नवीन जागी पुनस्र्थापना केली आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या धार्मिक व सामाजिक ठेवा जतन करताना सिडकोलाही आनंदच आहे.

– डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:26 am

Web Title: inauguration of shri swayambhu chintamani temple at kopar village zws 70
Next Stories
1 पक्ष्यांचे खारघर
2 पंधरा हजार  घरे पडून
3 गिर्यारोहणासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू
Just Now!
X