१५० रुपये डझनपासून उपलब्ध

कर्नाटकमधून मुंबईच्या घाऊक बाजारात येणाऱ्या हापूस आंब्याने येथील बाजारपेठेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कोकणच्या हापूस आंब्याप्रमाणेच दिसणाऱ्या या आंब्याच्या ४०-४५ हजार पेटय़ांची रोज आवक होत आहे. कोकणातून केवळ ३० हजार पेटय़ा येत आहेत. कर्नाटकी हापूसमुळे कोकणातील हापूसचे दर खाली आले आहेत. कोकणातील हापूस सध्या १५०-५०० रुपये प्रति डझनने विकला जात आहे, तर कर्नाटकी हापूस आंबा पन्नास रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहे. एका किलोमध्ये आकारानुसार सात ते आठ हापूस आंबे येतात.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

मागील काही वर्षांत कोकणातील हापूस आंब्याची कर्नाटकमध्ये मोठय़ा प्रमाणात लागवड केली गेली. हे आंबे सध्या मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, अमृतसर, चेन्नई या मोठय़ा शहरांत विकले जात आहेत. या हापूस आंब्याचा प्रचार हा कोकणातील हापूस म्हणूनच केला जातो. त्यामुळे त्याला मागणीही चांगली आहे. कोकणातील हापूस आणि कर्नाटकी हापूस यांच्यात साली व्यतिरिक्त फारसा फरक नाही. त्यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारावर या कर्नाटकी हापूस आंब्याने यंदा चांगलेच वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र आहे. दररोज चाळीस हजारांपेक्षा जास्त हापूस आंब्याचे क्रेट (प्लास्टिक) ज्यात वीस ते बावीस किलो हापूस आंबे सामावलेले असतात, ते मुंबईत येत आहेत. दुपारनंतर या आंब्याची छाननी केली जाते. स्वस्त आणि मस्त असलेल्या या आंब्यांना उचलदेखील चांगली असल्याचे व्यापारी सांगतात. विशेष म्हणजे हा हापूस आंबा आता दुबईतील अरबांना देखील आवडू लागला आहे. त्यामुळे हापूस आंब्याची निर्यात वाढली आहे.

कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याचा हंगाम आता संपायला आला आहे. शेवटच्या टप्प्यातील हापूस आंबा बाजारात पाठविण्याच्या स्पर्धेपोटी कोवळा आंबा बाजारात पाठविला जात असल्याने तो खराब होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. देवगडनंतर आता सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागांतील हापूस आंब्यांचे आगमन होणार आहे. ह्य़ा आंब्याचा हंगाम मे अखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

उत्तर, दक्षिण भारतातील मजुरांचा भरणा

कर्नाटकच्या हापूस आंब्याने मुंबईची घाऊक बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे दुपारनंतर घाऊक बाजारात या आंब्याची छाननी, प्रतवारीचे काम मोठय़ा जोमाने केले जाते. त्यासाठी खूप मोठय़ा प्रमाणात मजूर कामाला लागल्याचे दृश्य तुर्भे येथील फळांच्या घाऊक बाजारात दृष्टीस पडते. यात बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील मजुरांचा भरणा असतो. यात बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाणही जास्त आहे. ५-१० मजूर एकत्रितपणे व्यापार करतात. त्यासाठी कर्नाटकच्या आंबा बागेत मजुरांचा एक समूह काम करतो तर एक समूह मुंबई, पुण्यासारख्या घाऊक बाजारपेठेत काम करतो. कधीकाळी पांढरी टोपी घातलेले मजूर हे छाननीचे काम करत. त्याऐवजी आता लुंगी बनियान घातलेले मजूर हे काम करताना दिसतात. त्यामुळे मराठी माणसाच्या ताब्यात असलेला हा हापूस आंब्याचा व्यापार काही दिवसांनी परप्रांतीयांच्या हातात जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कर्नाटकी हापूस आंब्याचे गारूड घाऊक बाजारपेठेवर पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात घोंघावू लागले आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्यांचे दर आटोक्यात राहिले आहेत. कोकणातील हापूसचे दर १५० ते ५०० रुपये प्रति डझन आहेत. कर्नाटकमधील हापूस किलोमध्ये बाजारात येतो. पण डझनाचा विचार केला तर तो १२० रुपये प्रति डझनापर्यंत जातो. कर्नाटकच्या हापूस आंब्याचे कोकणातील हापूस आंब्यावरील आक्रमण आणि दरांची तफावत यामुळे या मालाला उठाव आहे. त्यामुळे तेथली मजूर व्यापारी झाल्याचे चित्र आहे. मराठी माणसाच्या मनात असलेला हा एकमेव बाजारदेखील आता परप्रांतीयांच्या हातात जाण्याची भीती आहे.

संजय पानसरे, माजी संचालक, एपीएमसी, तुर्भे