भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांची विक्रमी घोडदौड सुरू आहे. देशातील म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक गंगाजळीही महिनागणिक वाढत आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची मानके नांगी टाकत असली तरी या गुंतवणुका मात्र बजावत असलेली दमदार कामगिरी, उद्याचा काळ उज्ज्वल असल्याचेच सुचविणाऱ्या आहेत. गुंतवणुकीचा अशाच उज्ज्वलतेचा पथ खुला करणारे मार्गदशन आज येथे आयोजित कार्यक्रमातून केले जाणार आहे.

‘लोकसत्ता’तर्फे गुंतवणूकदार साक्षरतेसाठी आयोजित ‘लोकसत्ता अर्थभान’ मार्गदर्शन आज, १७ नोव्हेंबर २०१९ रोजी नवी मुंबईत योजण्यात आला आहे. ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत या गुंतवणूक जागराचे सत्र सायंकाळी ६ वाजता साहित्य संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी येथे होईल.

या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे. तसेच काही जागा निमंत्रितांकरिता राखीव आहेत. तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे गुंतवणूकदारांना या वेळी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्याची संधी उपलब्ध आहे.

आर्थिक सल्लागार तृप्ती राणे या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीविषयी या वेळी मार्गदर्शन करतील. सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीत फंड व समभाग, रोखे गुंतवणुकीची सांगड तसेच त्यांचे विविध प्रकार, त्यांचा कालावधी, विविध उद्योग क्षेत्रे व त्यांच्याशी निगडित फंड योजना, त्यातील परतावा हे सोदाहरणासह उलगडून सांगितले जाईल.

कुटुंबाची अपेक्षित आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक आर्थिक नियोजन, वयाच्या विविध टप्प्यांत, लक्ष्य पूर्ण करण्यासाठी योग्य निर्णय कसे घेता येतील, याबाबत अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी मार्गदर्शन करतील.

काय?

लोकसत्ता अर्थभान

कधी?

आज सायंकाळी ६ वाजता.

कुठे?

मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई</p>

मार्गदर्शक व विषय

तृप्ती राणे

म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ

कौस्तुभ जोशी

अर्थनियोजन महत्त्वाचे