‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये दररोज बक्षिसांची लयलूट; पर्वातील भाग्यवान विजेत्याला कार जिंकण्याची पर्वणी

ठाणे : आकर्षक भेटवस्तूंच्या रूपात खरेदीचा आनंद द्विगुणित करणारा ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ आजपासून (दि. २५) सुरू होत असून ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या शहरांत तो साजरा होत आहे. या शहरांतील सहभागी दुकानांमधून खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना दररोज आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. यंदाचा पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ रिजन्सी तसेच ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या  शहरांमधील ग्राहकांना खरेदीसोबतच आकर्षक बक्षिसे जिंकण्यासाठी संधी ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या माध्यमातून ठाणेकरांना दरवर्षी उपलब्ध होते. गेल्या सात वर्षांपासून हा महोत्सव होत आहे. यंदाच्या महोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या दुकानांमध्ये ठाणेकरांनी विविध वस्तूंची खरेदी केली तर त्यांना कुपण दिले जाणार आहे.  हे कुपन भरून दिल्यानंतर त्यातून दररोज भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर करून त्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे यंदाही ठाणेकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून विविध बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर अशा भेटवस्तूसह गिफ्ट व्हाऊचर आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज्चा समावेश आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यातील विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमातही ठाणेकरांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या खरेदी उत्सवाच्या अखेरीस अंतिम भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्याला कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहल अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

कसे सहभागी व्हाल?

  •   पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  •  सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयक दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.
  •  ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  •  अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळली जातील.
  • ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

 या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा  रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स  हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत. तर बंधन टुरिझम पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डीजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरंन्ट हे फूड पार्टनर, पंरपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्र्फट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत. तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी संपर्क

  •  कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१
  •  गोविंद भोसले- ९८१९८१४२५३
  •  गौरव याज्ञिक- ७५०६५२९०२०
  •  हर्षद गोफणे- ९७६९१३३३४३
  •  प्रदीप पंजाबी- ९८२१५३४६७७ (नवी मुंबई)