नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या आता ३० हजार पार झाली असून शहरात करोनामुक्तीचा दर ८६ टक्के झाला आहे. आतापर्यंत शहरात एकूण ३०,२९५ करोनाबधित झाले आहेत.

दरम्यान, शहरात आज दिवसभरात ३८१ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढच होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात आज ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ६५६ झाली आहे. तर शहरात ३,५०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत एकूण १,५८,०१५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर वाढला आहे. तर शहरातील मृत्युदर कमी झाला आहे.