19 February 2020

News Flash

मुख्यमंत्र्यांची स्वप्नपूर्ती अशक्य

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले.

सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात अजित पवार यांची टोलेबाजी

 नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०१९ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडू लागले आहे. मात्र, हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. वाशी येथे कोकण विभागीय राष्ट्रवादी सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

‘‘पंतप्रधान नरेंद मोदींचा कारभार हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे. सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवले. मोठमोठी आश्वासने देऊन मोदी सत्तेवर आले. मात्र, त्यांना एकाही आश्वासनाची पूर्तता करता आलेली नाही. सत्ताधारी भाजपने देश आणि राज्याला डबघाईला आणले आहे’’ असे अजित पवार म्हणाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी सरचिटणीस सुनील तटकरे, गणेश नाईक, अनिकेत तटकरे, पार्थ पवार, शशिकांत शिंदे, प्रमोद हिंदुराव आदी उपस्थित होते.

First Published on October 9, 2018 3:16 am

Web Title: ncp leader ajit pawar target maharashtra and central bjp
Next Stories
1 एनएमएमटीची रात्रसेवा महागली
2 तीन वर्षांत सव्वा दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त
3 घटांच्या रूपात शहाळ्याचे मुखवटे
Just Now!
X