19 February 2020

News Flash

‘एनएमएमटी’ बस चालकाला मारहाण तिघांना अटक

बाजू दिली नाही म्हणून ‘एनएमएमटी’च्या चालकाला गाडीतून बाहेर काढून मारहाण

(संग्रहित छायाचित्र)

बाजू दिली नाही म्हणून ‘एनएमएमटी’च्या चालकाला गाडीतून बाहेर काढून मारहाण करण्यात आली. शुक्रवारी कोपरखैराणे येथे ही घटना घडली असून पालिसांनी तिघांना अटक केली आहे. गेल्या २० दिवसांत एनएमएमटी चालकाला मारहाणीची ही तिसरी घटना आहे.

श्रीधर रेवडेकर, शुभम रेडेकर, रविकांत साकपाळ असे अटक करण्यात आलेल्या ‘एनएमएमटी’ बस चालकाला मारहाण आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास मार्ग क्रमांक १२ ची ‘एनएमएमटी’ बस कोपरखैरणे येथून वाशीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी आरोपी आपल्या गाडीवरून जात होते. बसने बाजू दिली नसल्याचा रागातून त्यांनी ब्ल्यू डायमंड चौकात ‘एनएमएमटी’च्या समोर स्वत:ची गाडी थांबवत बसचालक नानाजी बुवा याला शिवीगाळ केली. त्यांना गाडी बाहेर काढून बेदम मारहाण केली व ते निघून गेली. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपींचा गाडी क्रमांक मिळवून त्याद्वारे आरोपींचा शोध घेत अवघ्या दोन तासांत पोलिसांनी त्यांना अटक केली. एनएमएमटीचा पाठलाग करताना त्यांनी एका रिक्षालाही धडक देत पुढे आल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

First Published on September 7, 2019 2:13 am

Web Title: nmmt bus driver fight akp 94
Next Stories
1 नव्या मुंबईत जुने उद्योग डबघाईला
2 राजकीय फलकबाजीचे पेव
3 पालिका रुग्णालयाबाहेर ऐरोलीत पार्किंग समस्या
Just Now!
X