फ्लेमिंगो अभयारण्य संवेदनशील क्षेत्र परवानगी मिळविण्यासाठी प्रतीक्षाच

संतोष जाधव, लोकसत्ता

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वाशी बसस्थानक आणि वाणिज्य संकुल प्रकल्प गेले आठ महिने परवानगींच्या फेऱ्यात अडकला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नुकतीच मिळाली असली तरी हा प्रकल्प फ्लेमिंगो अभयारण्य संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने याबाबतची परवानगी मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या भूखंडाभोवती पत्रे ठोकून तो बंदिस्त करण्यात आला आहे.

एनएमएमटी सध्या महिन्याकाठी पाच कोटी ५० लाख रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे वाशी येथील ‘एनएमएमटी’च्या बसस्थानकावर १८० कोटी रुपये खर्चाचे व्यावसायिक संकुल उभारण्यात येत आहे.

वने आणि पर्यावरण विभागाने ठाणे, ऐरोली आणि वाशीपर्यंतचा भाग खाडीक्षेत्रासाठी संरक्षित म्हणून जाहीर केला आहे. सध्या वाशी सेक्टर-९ मधील बसस्थानकाचा भूखंड खाडीपासून संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

फ्लेमिंगो खाडीक्षेत्राची मयाद्द्रदा ही दहा किमीवरून ३.१ किमीवर कमी करण्याबाबतची बाब न्यायप्रविष्ट आहे.

बसस्थानक आणि वाणिज्य संकुलातून उत्पन्न मिळण्याच्या आशा एनएमएमटीला आहेत. वाशी बसस्थानकाच्या कामाचा कार्यादेश महापालिकेने ठेकेदाराला दिलेला आहे.

वाणिज्य संकुलासाठीची प्रदूषण नियामक मंडळाची परवानगी मिळाली आहे, परंतु फ्लेमिंगो खाडीक्षेत्राबाबतची परवानगी अद्याप मिळाली नाही. खाडीक्षेत्राची मर्यादा ३.१ किमीवर आणल्याने संकुलाला परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे.

 – शिरीष आरदवाड, व्यवस्थापक परिवहन उपक्रम

* वाशी सेक्टर-९अ येथील बसस्थानक आणि वाणिज्य संकुल उभारणे

*  कार्यादेश दिनांक : २५ जुलै २०१९

* कामाचा कालावधी : २६ महिने

* कंत्राटाची रक्कम : १६९,६६,४०,०५५ रुपये

* कंत्राटदार : मे. अश्विन इन्फ्राडेव्हलपमेंट प्रा. लि.