आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

नवी मुंबई : भविष्याचा विचार केल्यास देशाची प्रगती होईल, असे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

वाशी येथे युवा उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते. आज जगभरात पर्यावरणाचे प्रश्न भेडसावत आहेत. आजचे युवा पिढी प्रश्न  विचारते तेव्हा भविष्यातील सुधारण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्या असा सल्ला त्यांनी दिला. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असला तरीही आजचा युवक राजकारणाविषयी विचार करीत असून भविष्याचा विचार करावयाचा असेल तर राजकारण हे उत्तम व्यासपीठ असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या युवा उद्योजकता  मेळाव्यास देशभरातील ४६ शहरांमधील दीड हजार तरुण उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्यात विविध चर्चासत्रांमधून तरुणांना आपल्या व्यवसायाचे आणि भविष्याचे नियोजन कसे करायचे याबाबतचा मार्गदर्शन करण्यात आले

मेळाव्यात यंग इंडियाचे प्रमुख कार्तिक शाह, भैरवी जैन, राहुल मिरचंदानी, सी. व्ही. संजय रेड्डी, श्रीकांत सूर्यनारायण, अनुष रामास्वामी उपस्थित होते.

हिंगणघाटची घटना ही दुर्दैवी आहे सांगत आदित्य यांनी अशा घटना घडू नये, यासाठी अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक आहे. तसा बदल करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.