घाऊक बाजारात किलोमागे १५ रुपयांनी वाढ; किरकोळीत भाव शंभरीपार होण्याची शक्यता

नवी मुंबई पुरेशा पावसाअभावी डाळींचे उत्पादन घटल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात आवक घटली आहे. यामुळे घाऊक बाजारात डाळींच्या किमती किलोमागे सरासरी १५ रुपयांनी वाढल्या असून, किरकोळ बाजारात डाळींचा दर शंभरीपार होण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपूर्वी कडाडलेल्या डाळींच्या भावात गेल्या वर्षी घट झाली होती, मात्र गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याने डाळींचे उत्पादन घटले आहे. राज्यातील विविध भागांसह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून वाशीच्या कृषी उत्पन्न बाजारात डाळींची आवक होते. याआधी या बाजारात रोज २५ ते ३० गाडय़ांतून डाळींची आवक होत होती, मात्र सध्या बाजारात डाळींच्या १५ ते २० गाडय़ा दाखल होत आहेत. त्यामुळे डाळींचे दर किलोमागे १२ ते १५ रुपयांनी वाढले आहेत.

घाऊक बाजारात याआधी ६० ते ७० रुपये किलो असलेली तूर, मसूर आणि मूगडाळ आता ८० ते ९० रुपयांवर पोहोचली आहे. चणाडाळ ५० ते ६० रुपयांवरून ६५ ते ७० रुपयांवर गेली आहे. किरकोळ बाजारात तूर, मूगडाळ ८० रुपयांवरून ९६ रुपये प्रतिकिलोने विकली जात असून, चणाडाळ ८० रुपये आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात घाऊक बाजारात या डाळी ५० ते ७० रुपये किलोने मिळत होत्या. यंदा घाऊक बाजारातील दरवाढीमुळे किरकोळ बाजारात डाळींच्या किमती शंभरी पार करतील, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

मतपडताळणीला अग्रक्रम नाकारला

यावेळी मतमोजणीच्या आधी मतपावत्यांचा निकाल जाहीर करावा आणि नंतर मतपडताळणी करावी, अशी विरोधी पक्षांची मागणी होती. ती निवडणूक आयोगाने फेटाळल्याने आधी मतमोजणी होईल आणि मग मतपावत्यांची पडताळणी होईल. त्यामुळे निकालांचा कल स्पष्ट होण्यास फारसा विलंब होणार नाही. मात्र, प्रत्यक्ष निकाल रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

पहिला कल पाऊण तासात?

मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिला कल अर्ध्या ते पाऊण तासात जाहीर होईल आणि तो दक्षिणेतील असेल, असा अंदाज आहे. एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघातला कल सर्वप्रथम जाहीर होण्याची शक्यता आहे. तेथील माध्यमप्रतिनिधींच्या दाव्यानुसार साडेआठलाच हा कल जाहीर होईल.

ज्वारी, बाजरीही महाग

यंदा ज्वारी, बाजरीही महाग झाली आहे. गेल्या वर्षी घाऊक बाजारात १८.८३ रुपये किलोने मिळणारी बाजरी यंदा २५.४५ रुपयांवर पोहोचली आहे. तसेच २४.६७ रुपयांना मिळणारी ज्वारी यंदा ३३.४६ रुपयांवर गेली. किरकोळ बाजारात ज्वारीची ५० ते ६० रुपये किलोने विक्री होत आहे.