स्वराज बिल्डर्सचे प्रमुख राज कंधारी यांनी पामबीचमधील राहत्या घरामध्ये स्वत:च्या रिव्हॉल्वरने डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी राज कंधारी यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी चार दिवसांनतर पोलिसांच्या हाती लागली आहे.
त्यात कंधारी यांचे बांधकाम व्यावसायामध्ये सहकारी असलेले बिपीन थापर यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नोंद आहे. पोलिसांनी बिपीन थापर याला अटक केली आहे. शनिवारी बिपीन थापर याला न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे परिमंडळ १चे पोलीस उपआयुक्त प्रशांत खरे यांनी सांगितले.
महानगरपालिका व सिडकोने नियोजित प्रकल्पाला मंजुरी मिळत नसल्याने व आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे समोर येत होते. तर बांधकाम व्यावसायिकांनीदेखील सिडकोला यामध्ये जबाबदार धरले होते.

पण राज कंधारी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी त्यांच्या कुटुंबीयांच्या हाती लागली असून, ती कुटुबीयांनी पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. त्यामध्ये सहकारी बिपीन थापर याच्यामुळे व्यवसायात मोठे नुकसान होऊन कर्जबाजारी झाले असल्याचे म्हटले आहे.
त्यानुसार पोलिसांनी बिपीन थापर याला अटक केली आहे. शनिवारी थापर याला न्यायालयात हजर करणार असल्याचे नवी मुंबई परिमंडळ १चे पोलीस उपआयुक्त चंद्राकात खरे यांनी स्पष्ट केले.