News Flash

दि.बा. महाविद्यालयासाठी सिडकोला साकडे

सिडको मार्फत संस्थेने दोन कोटींची पाच एकर जमिनीही खरेदी केली आहे

संस्था इमारतीसाठी बोकडबिरा येथे पाच एकर भूखंड

दिवंगत माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नावे सर्वपक्षीयांनी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा संकल्प केला आहे. मात्र, मागील तीन वर्षांत हा संकल्प अर्धवट राहिल्याने प्रकल्पग्रस्त सामाजिक व शैक्षणिक संस्थेने अखेरीस सिडकोला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी साकडे घातले आहे. त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन सिडकोकडून दिल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आलेली आहे.

याकरिता सिडको मार्फत संस्थेने दोन कोटींची पाच एकर जमिनीही खरेदी केली आहे.राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व शैक्षणिक कार्यातही अग्रेसर असलेल्या दि. बा. पाटील यांनी पनवेल येथे ६० च्या दशकात उभारलेल्या महात्मा फुले महाविद्यालयामुळेच रायगडसह नवी मुंबईतील बेलापूर पट्टीतील शेतकऱ्यांच्या मुलांना पदवी शिक्षण पूर्ण करता आले. उरण ही दिबांची जन्मभूमी आहे.

त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व येथील स्थानिक भूमिपुत्रांना हक्काचे उच्च तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी या संस्थेने त्यांच्याच नावाने अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला.

त्यामुळे या महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता. अनेकांनी या महाविद्यालयासाठी आपले निवृत्तिवेतनाचे पैसे दिले. संस्थेने उसणवाऱ्या करून उरण-पनवेल रस्त्यालगतची बोकडवीरा येथील जमीन खरेदी केली. त्यासाठीच्या सर्व परवानग्याही मिळविल्या. महाविद्यालयाचा आराखडा वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांना विनामोबदला करून दिला आहे. महाविद्यालयासाठी येथील ओएनजीसी, जेएनपीटी, वायू विद्युत केंद्र आदी आस्थापनांना त्यांच्या सामाजिक जबाबदारी निधीतून सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आलेले आहे.  तसेच नागरिकांकडूनही निधीची मागणी केली आहे.

हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अखेरीस प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना साकडे घातले असल्याची माहिती संस्थेच े सचिव  संतोष पवार यांनी दिली  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 2:14 am

Web Title: resolution to set up a college of engineering in uran
Next Stories
1 दात काढताना महिलेचा मृत्यू
2 बसगाडय़ांची जागोजागी बसकण ; एनएमएमटीचे प्रवासी मेटाकुटीला
3 वादळामुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावरच
Just Now!
X