बेलापूर, नेरुळ, ऐरोलीतील पालिका रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : कोटय़वधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली पालिकेची तीन रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली. नवी मुंबईतील नेरुळ, ऐरोली आणि बेलापूर येथील टालेजंग इमारतीतील रुग्णालयांत प्राणवायूचा  (ऑक्सिजन) पुरवठा करण्यासाठी वाहिन्या टाकण्यास सुरू करण्यात आले आहे. तसे आदेश पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत.

तीनही नोडमधील रुग्णालयांत आजवर तुटपुंज्या आरोग्य सुविधा दिल्या जात होत्या. त्यातही या ्ररुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरविण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या वाहिन्यांच्या कामावरून  मध्यंतरी जोरदार राजकारण रंगले होते.

वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय गेले तीन महिने संपूर्ण करोना रुग्णालय करण्यात आले आहे. या ३०० खाटांच्या रुग्णालयावर शहरातील सामान्य नागरिकांची भिस्त होती. मात्र, या रुग्णालयाला ‘कोविड’ दर्जा देण्यात आल्याने सामान्य रुग्णांची फरफट सुरू होती. त्यामुळे वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाला पुन्हा सार्वजनिक रुग्णालय बनवावे व वाशीतील करोना रुग्ण सिडको प्रदर्शनी केंद्र येथे हलवण्याची मागणी होत होती. यावर आयुक्तांनी या रुग्णालयात सामान्य रुग्णांना कसे उपचार देता येतील, यावर विचार सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. याशिवाय नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालयात ३०० खाटा तसेच ७५ आयसीयू खाटांची सोय करण्याचे आदेश  अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अनेक वर्षे पालिकेच्या ऐरोली, नेरुळ आणि बेलापूरमधील रुग्णालयांची अवस्था नाजूक झाली होती.

अतिदक्षता विभाग

* नेरुळ आणि ऐरोली मधील रुग्णालयांत प्रत्येकी ७५ खाटा

* वाशी येथे नव्याने उभारलेल्या प्रदर्शनी केंद्रातील कोविड रुग्णालयात ७५ खाटा

वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय नेरुळ येथे आणि  वाशी प्रदर्शनी केंद्रातील कोविड रुग्णालयात टप्प्याटप्प्याने हलवण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त

वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय नेरुळ येथे आणि  वाशी प्रदर्शनी केंद्रातील कोविड रुग्णालयात टप्प्याटप्प्याने हलवण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त