01 March 2021

News Flash

वाशीतील ‘मोजोज पब’ परवानगीविना

कमला मिल दुर्घटनेनंतर पालिका आणि पोलीस शहरातील सर्व पबची तपासणी करत आहेत.

मुंबईतील कमला मिलमध्ये लागलेल्या आगीला कारणीभूत असलेल्या पबपैकी एक असलेल्या ‘मोजोज पब’च्या वाशी येथील दुसऱ्या हॉटेलला नवी मुंबई पालिकेने परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेची परवानगी नसताना हा पब सुरू होता. या पबमध्ये एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची भागीदारी असल्याने पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. हा पब आता बंद करण्यात आला आहे.

कमला मिल दुर्घटनेनंतर पालिका आणि पोलीस शहरातील सर्व पबची तपासणी करत आहेत. यात वाशी सेक्टर ३० मध्ये बंद करण्यात आलेल्या ‘मोजोज पब’ने नवी मुंबई पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्रच घेतले नसल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हा पब विनापरवाना चालविला जात होता. पबमध्ये शहरातील बडय़ा असामीच्या मुलाची भागीदारी असल्याने पालिका व पोलिसांना न जुमानता तो चालविला जात होता, अशी चर्चा आहे. मुंबईमधील ‘मोजोज’वर संक्रांत आल्यानंतर वाशीतील पबला टाळे ठोकण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 2:48 am

Web Title: vashi mojo bistro is running without permission nmmc
Next Stories
1 नवी मुंबई पालिकेची जेनेरिक औषधालये
2 उपाहारगृहांवर कारवाईचा बडगा
3 व्यवहार, व्यापाराला विराम
Just Now!
X