एपीएमसी पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले असून दिपेश हिरानाथ पवार, (वय १९ वर्षे राहणार डोंबीवली, ठाणे ) असे त्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसात एपीएमसी परिसरात जबरी चोरीचे प्रमाणात वाढ झाली होती. त्या अनुषंगाने एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी विशेष पथक तयार करून जबरी चोरी प्रकरणांचा तपास सुरू करण्याचे निर्देश दिले होते. हा तपास करताना गुन्हे स्थळांचा तांत्रिक तपास केला असता दिपक पवार या संशयित आरोपीस सुरवातीला ताब्यात घेतले. पोलिसी पद्धतीने चौकशी केली असता त्याने ए.पी.एम.सी, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे पोलीस ठाणे क्षेत्रात केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.      

आरोपी कडून १३ हजार ९९९ चा मोबाईल जप्त करण्यात आला आहे .आरोपीने असेच अनेक गुन्हे केल्याचा अंदाज पोलिसांना आहे. या बाबत तपास सुरू आहे