21 year old girl dies in bike accident on uran panvel highway zws 70 | Loksatta

पनवेल : कंटेनर-दुचाकी भीषण अपघातात तरुणींचा मृत्यू

सेजल या उरणमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यास असून त्यांच मुळ गाव रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आहे.

पनवेल : कंटेनर-दुचाकी भीषण अपघातात तरुणींचा मृत्यू
वाशी येथे शिकवणीवर्गासाठी जात असताना हा अपघात घडला

उरण पनवेल महामार्गावर गव्हाण फाट्याजवळ सकाळी साडेदहा वाजता दुचाकी आणि कंटेनरच्या भीषण अपघातात २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सेजल अंबेतकर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघाता नंतर वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते, मात्र रुग्णालयात उपचारा दरम्यान सेजल यांचा मृत्यू झाला. सेजल या उरणमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यास असून त्यांच मुळ गाव रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आहे.

सेजल या वाशी येथे शिकवणीवर्गासाठी जात असताना हा अपघात घडला. त्यांना दुचाकी चालविण्याचा छंद होता. पदवीधर असणाऱ्या सेजल या दुचाकी स्वारीत प्राविण्य कमावलेल्या दुचाकी स्वार असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पनवेल शहर पोलीसांनी अवजड वाहन रस्त्यावर इतर वाहनचालकांना अडथळा होईल या पद्धतीने उभे केल्याने हा अपघात झाल्याचे पोलीसांनी सांगीतले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान नवी मुंबई शहर सज्ज ; १६ देशांचा सहभाग , ३० ऑक्टोंबरला अंतिम सामनाही डी.वाय पाटील मैदानावरच

संबंधित बातम्या

नवी मुंबई ते अलिबाग अंतर केवळ सव्वा तासात, बेलापूर ते मांढवा वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू
नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न महिन्यातभरात सोडविणार ; राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
पनवेल : पोलिसांकडून कळंबोलीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी बनवले विद्युत वाहन चार्जिंग केंद्र
नैसर्गिक शेती आणि कृषी व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित – अब्दुल सत्तार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India vs NZ 2nd ODI: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात