scorecardresearch

पनवेल: कर्णकर्कश आवाजाचे ४७ सायलेन्सर नष्ट

धूम स्टाईलने दुचाकी चालविणा-या दुचाकीचालकांना पनवेल वाहतूक पोलीसांनी चांगलाच धक्का दिला आहे.

पनवेल: कर्णकर्कश आवाजाचे ४७ सायलेन्सर नष्ट
४७ दुचाकींचे कारवाईनंतर जमा केलेले सायलेन्सरच पोलीसांनी भर चौकात शुक्रवारी नष्ट केले.

पनवेल: धूम स्टाईलने दुचाकी चालविणा-या दुचाकीचालकांना पनवेल वाहतूक पोलीसांनी चांगलाच धक्का दिला आहे. प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करुन दुचाकीचा कर्णकर्कश आवाज करणा-यांवर कारवाई करुन पोलीस थांबले नाहीत. तर ४७ दुचाकींचे कारवाईनंतर जमा केलेले सायलेन्सरच पोलीसांनी भर चौकात शुक्रवारी नष्ट केले. नष्ट केलेल्या सायलेन्सरचे बाजारमुल्य अडीच लाख रुपयांपर्यंत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोलर चढवून हे सायलेन्सर नष्ट करण्याची कारवाई पनवेलकरांसाठी अनोखी होती. इतर दुचाकी मालकांनी पुन्हा अशा कर्णकर्कश सायलेन्सरचा प्रयोग करु नये असा संदेश या कारवाईच्या निमित्ताने पोलीसांना द्यायचा आहे.

हेही वाचा >>> जेएनपीटी लाँच सेवा गेट वे ऐवजी भाऊच्या धक्क्यावरून; ‘नेव्ही डे’साठी चार दिवस गेटवे धक्का बंद

व्हिडिओ :

पनवेल शहर वाहतूक शाखेने वर्षभरात शहराच्या विविध भागात धूमस्टाईल कर्णकर्कश आवाज करणा-या दुचाकीचालकांवर दंडाची कारवाई केली होती. प्रती दुचाकीचालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता. परंतू एवढ्या कारवाई करुन भागणार नाही असे ध्यानात आल्यावर पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय नाळे यांनी ध्वनी प्रदूषण करणा-या सायलेन्सरवर कायमचा तोडगा काढण्यासाठी अजून एक पाऊल टाकले. पोलीसांच्या दंडाच्या कारवाईनंतर दुचाकीचालकांनी बदल केलेले सायलेन्सर स्वता पोलीसांना दिले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने संबंधित सायलेन्सर बदल केल्याचे प्रमाणपत्र दिले. याच प्रमाणपत्राचा अहवाल न्यायालयासमोर सादर केल्यावर शुक्रवारी सार्वजनिक ठिकाणी हे सायलेन्सर नष्ट करण्याची कायदेशीर प्रक्रीया वाहतूक पोलीसांनी पार पाडली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:12 IST

संबंधित बातम्या