नवी मुंबई : पोटचे १७ दिवसांचे बाळ अडीच लाखांना विक्री करणारी आई आणि अन्य सात जणांना अटक करण्यात आली आहे. या व्यवहाराबाबत  अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाला माहिती मिळताच केलेल्या कारवाईत सर्व प्रकार उघडकीस आला.मुमताज मंडल , मुमताज खान, नदिम शाहिद अहमद अन्सारी , गुलाम गौस अहमद अन्सारी , सुरेश शामराव कांबळे ,सर्व राहणार मुंब्रा तसेच जुबेदा सैयद रफिक , शमिरा बानु मोहद्दीन शेख , दोघे राहणार चिता कॅम्प ट्रॉम्बे आणि बांद्रा येथे राहणार दिलशाद आलम  असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हि टोळी तान्ह्या मुलांना पळवून नेऊन किंवा पैशांचे आमिष पालकांना दाखवून तान्ह्या मुलांची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.या माहितीच्या आधारावर पोलिसांनी स्वतः बनावट ग्राहकांच्या द्वारा सदर टोळीशी संपर्क केला. याच बनावट ग्राहकांना १७ दिवसांचे बाळ असल्याचे त्या टोळीने सांगत अडीच लाख रुपये किंमत सांगितली. याला होकार देत खारघर येथे त्यांना बोलावून घेतले. त्याच वेळेस सापळा लावून खारघर सेक्टर २१ येथे आरोपींना अटक करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>घाऊक व स्वस्त मासळीसाठी उरणला या ! करंजा बंदर खुला झाल्याने मासळीची आवक वाढली

हेही वाचा >>>करंजाडे, कामोठे, कळंबोली येथील सिडको वसाहतीत पाण्याची बोंब; पावसाळ्यातही टँकर मागवण्याची वेळ

यातील मंडल ही बाळाची आई आहे.तर नदीम हा टोळीचा सूत्रधार आहे. सुरवातीला नदीम मंडल आणि मुमताज यांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत अन्य आरोपींचा ठावठिकाणा मिळाला.आरोपींच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

याप्रकरणी मुमताज आणि नदीम प्रकरणी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी एक महिला बनावट ग्राहकाला त्यांच्याशी संपर्क करण्यास लावला. सुमारे एक महिना समाज माध्यमातून संवाद झाल्यावर हा व्यवहार ठरला. या टोळीने यापूर्वीच चार बालकांची विक्री केल्याचे समोर आले आहे. अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 17 day old baby was sold for two and a half lakhs in navi mumbai amy
First published on: 22-08-2023 at 16:53 IST