उरण: जेएनपीटी बंदराच्या तेल जेट्टीच्या लोखंडी बीमवर शुक्रवारी एक भला मोठा अजगर आढळला आहे. मात्र समुद्रात असलेल्या जेट्टीवर हा अजगर कसा या बद्दल प्रश्न पडला असून आश्चर्य ही व्यक्त केलं जात आहे. या अजगराला पकडण्यासाठी सर्प मित्रांना बोलावण्यात आले आहे.
बीपीसीएल सह विविध सरकारी व खाजगी कंपन्याचे तेल व तेलजन्य पदार्थ आखाती व जगातील उत्पादक देशातून आयात केले जातात. या देशातून जहाजातून दररोज लाखो मेट्रिक टन आयात केली जातात. त्यानंतर हे तेल वाहिनीद्वारे बंदर परिसरातील साठवणूक टाकीत एकत्रित केले जाते व ते रेल्वे व टॅंकरने देशभरात पोहचविण्यात येते. यासाठी जेएनपीटी ने तेल जेट्टी उभारली आहे.
हेही वाचा… अक्कादेवी धरण तुडुंब भरले
या जेट्टीवर हा भला मोठा अजगर आढळल्याने त्याची सुटका करण्यासाठी उरण मधील सर्प मित्रांना पाचारण करण्यात आले आहे.