उरण : करंजा बंदरात संशयित बोट ताब्यात | A suspect boat was detained at Karanja port in Uran amy 95 | Loksatta

उरण : करंजा बंदरात संशयित बोट ताब्यात

उरण येथील करंजा बंदरात सोमवारी एक संशयित बोट ताब्यात घेण्यात आली असून उरण पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत.

उरण : करंजा बंदरात संशयित बोट ताब्यात
करंजा बंदरात संशयित बोट ताब्यात

उरण येथील करंजा बंदरात सोमवारी एक संशयित बोट ताब्यात घेण्यात आली असून उरण पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत. उरण ते रेवस या अरबी समुद्रातील दोन बंदराच्या परिसरात उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी गस्त घालत असतांना त्यांना वीना क्रमांकाची बोट जात असल्याचे निदर्शनास आले असता. या संशयित बोटीचा रेवस बंदरातील सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांना माहिती दिल्या नंतर संशयित बोट उरणच्या करंजा बंदरात नांगरण्यात आली आहे.

हेही वाचा >>> खराब रस्त्यांमुळे उरणमध्ये ‘धुळवड’, चालक-प्रवाशांना सक्तीचा मनस्ताप

या बोटीचा उरण पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळाला उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली. बोटीत डिझेल आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी बंदरात गस्ती घालीत असतांना विना क्रमांकाची बोट आढळून आली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती उरणचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सुरेश बहुलगावे यांनी दिली

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
खराब रस्त्यांमुळे उरणमध्ये ‘धुळवड’, चालक-प्रवाशांना सक्तीचा मनस्ताप

संबंधित बातम्या

नवी मुंबई मेट्रोला १५ ऑगस्टचा मुहूर्त
नवी मुंबई : दसरा मेळाव्या यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक
नवी मुंबईत पारदर्शक व नियोजबद्ध काम करणार ,सुंदर शहराला अधिक गतिमान करणार ; राजेश नार्वेकर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी
‘ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये’; राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन श्रीकांत शिंदे आक्रमक
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘समृद्धी महामार्गावरून’ एकत्र प्रवास केलेली गाडी कोणाची? काँग्रेसचा खळबळजनक आरोप; म्हणाले…
‘तो’ झेल सुटला अन् भारताचा खेळ खल्लास, भर मैदानातच कर्णधार रोहित शर्मा भडकला, Video होतोय तुफान Viral