गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे यात त्याचाच मामेभाऊ असल्याचा शोध सुरू आहे. ही घटना पनवेल येथे घडली असून गाढी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली आहे.यात विक्रम जमादार (वय२१) असे मयत युवकाचे नाव असून त्याचाच मामेभाऊ राजशेखर जमादार याचा शोध सुरू आहे. पनवेल येथील कमांडर रेनाई या सोसायटीतील गणेशाचे विसर्जन करण्यास गेले होते. गणपती मूर्ती विसर्जन करण्यास गाढी नदीत काही युवक उतरले मात्र पाण्याचा जोर आणि खोली याचा अंदाज न आल्याने विक्रम जमादार सह काही युवक बुडाले हे लक्षात येताच राजशेखर हा मोबाईल विजेरीने त्यांचा शोध घेत असता तोही बुडाला.हे कळताच आपत्कालीन पथक घटनास्थळी आले त्यांनी हळू हळू करीत काही जणांना बाहेर काढले मात्र शेवटपर्यंत जमादार बंधू सापडले नाही.
हेही वाचा >>> नवी मुंबईकरांना पुन्हा ताज्या, स्वस्त भाजीपाल्याचा पर्याय
रात्रीचा अंधार असल्याने शोध घेण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या सकाळी पुन्हा नव्याने शोध कार्य सुरू केल्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास विक्रम याचा मृतदेह सापडला मात्र साडेतीन वाजे पर्यंत राजशेखर याला शोधण्यात अपयश आले. मात्र अद्याप त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षण रवींद्र दौंडकर यांनी दिली.