नवी मुंबईतील तुर्भे भागात वीजेची चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. महावितरणच्या भांडूप परिमंडळात वीज चोरी पकडण्याची कारवाई सतत सुरू असते. अशाच एका कारवाईत तुर्भे येथील सेक्टर २२ मध्ये एकूण ६.२९ लाखाची वीजचोरी उघडकीस आली आहे. चोरीत पकडण्यात आलेल्या ग्राहकांनी ६.२९ लाख रुपयांची वसूल करण्यात आली आहे.

हेही वाचा- शुल्लक कारणावरुन दोन कुटुंबात हाणामारी; पोलिसांत गुन्हे दाखल

तुर्भे मॅफ्को शाखेअंतर्गत वीजचोरी करणाऱ्यांवर छापे टाकून नुकतीच कारवाई करण्यात आली. एकूण आठ जणांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये वीज अधिनियम २००३ कलम १३५ अन्वये सात वीजग्राहकांवर कारवाई करण्यात आली . त्यापैकी चार ग्राहकांनी वीजचोरीचे ६ लाख २९हजार ५१० रूपयांचे दंडाचे देयक भरले. उर्वरित तीन ग्राहकांवर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच वीज अधिनियम २००३ कलम १२६ अन्वये एक ग्राहकांवर कार्यवाही करण्यात आली.

हेही वाचा- विद्यार्थीनीचा मोबाईल लंपास, सिंघम पोलिसांनी पाच मिनीटांत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

सदर वीजचोरी शोध मोहिमेकरिता अधीक्षक अभियंता राजाराम माने व कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे तसेच रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संजय मुंढे, पवन राऊत, सचिन फुलझले, जयेश गायकर, श्रद्धा भोजकर व कर्मचारी निकिता आगरकर, विशाल गिरी, विशाल चव्हाण यांनी कारवाई केली. ग्राहकांनी अधिकृतपणे वीज वापर करावे व वापरलेल्या विजेचे बिल नियमितपणे भरावे. चोरीची वीज वापर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.