नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडियन स्वच्छता लिगमधील ‘ कचरा विरोधात लढाई’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी राजीव गांधी मैदानात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहून या शहराचे स्वच्छता कार्य हे वाखाण्याजोगे आहे असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबई महापालिका आणि शहराने सन २०१५ पासून स्वच्छता कार्य हाती घेतले आहे. तेव्हा पासून नवी मुंबई शहराने आघाडी घेतली आहे.आजमितीला स्वच्छतेबाबत ज्या पध्दतीने नागरिकांमध्ये गांभीर्य आहे ते अतिशय वाखाण्याजोगे आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या शहरात ज्या- ज्या घटकांनी स्वच्छतेत सहभाग घेतला आहे. विशेषतः आज तृतीय पंथी यांच्या कडून ही स्वच्छता करण्यात आली . नवी मुंबई शहरात ज्या पद्धतीने सर्वच स्तरातून स्वच्छता अभियानात सहभाग घेतला जात आहे. इतर ठिकाणी ही आशा पद्धतीने आदर्शवत स्वच्छता अभियान राबविले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. ओला सुका आणि घातक अशा तीन पद्धतीने कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. त्याच बरोबर तरूणांना यामध्ये समाविष्ट करून स्वच्छता जागर करणे हे महापालिकेचे वेगळे अभियान आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor makarand anaspure expressed cleanliness work of navi mumbai city is commendable tmb 01
First published on: 22-09-2022 at 16:24 IST