नवी मुंबई : वाशी कृषी उत्पन्न बाजारात राज्यातील सर्व बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार(ई-नाम) च्या माध्यमातून एकाच छताखाली आणण्यात येणार होती. त्यासाठी कांदा बटाटा बाजारात ई नाम योजनेअंतर्गत कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी आद्यप सुरू झाली नाही. त्यामुळे कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा वापराविना बंद असून कागदावरच राहिलेली आहे.एपीएमसी बाजारात जानेवारी २०१९ पासून ईनाम योजना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी या ई नाम योजने अंतर्गत शेतमालाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात आली होती.

ई नाम योजनेत मालाच्या खरेदी विक्रीसाठी ई लिलाव (ई ऑक्शन) होणार होते. यामध्ये खरेदी-विक्रीदाराला ई नाम पोर्टलवर समाविष्ट करून एक मोबाईल ऍपच्या मदतीने शेतकरी – व्यापारी, अडते यांनी ऑनलाईन बोली लावून ज्याचा सर्वात अधिक बाजारभाव असेल त्याला ते खरेदी करता येणार होते.मात्र या योजनेला शेतकरी, व्यापारी यांनी प्रतिसाद दिला नाही तर एपीएमसी प्रशासनाने देखील याचा पाठपुरावा केला नाही.

हेही वाचा : उरण : चार कोटी खर्च करून देखील मोरा बंदर पुन्हा रुतले गाळात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिया खंडातील एवढ्या मोठया बाजारपेठेला ही ऐका खोलीची प्रयोगशाळा अपुरी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी याला प्रतिसाद दिले नसल्याचे समोर येत आहे. कृषी माल गुणवत्ता तपासणी केंद्र प्रयोगशाळा व ई लिलाव गृह हे एपीएमसी बाजाराची व्याप्ती मोठी असून कमी पडत आहे त्. यामुळे याठिकाणची प्रयोगशाळा वापरण्यास अडचणीचे असल्याचे मत व्यापारि करीत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही शेतमाल गुणवत्ता तपासणी केंद्र प्रयोगशाळा वापराविना धूळखात पडून आहे.