नवी मुंबई: ऐरोली खाडी पुलासाठी सेंगमेंन्ट लॉन्चिग करण्याचे काम शनिवार पासून सुरु करण्यात येत आहे. या कामामुळे ऐरोली जामा मशीद पासून श्रीराम विद्यालय कडे जाणारा रस्ता वाहतुकीस १ जून पर्यंत बंद करण्यात येणार आहे.

मुलुंड ऐरोली खाडी पुलाचे ऐरोली सेक्टर ४ ऐरोली येथील टपाल कार्यालय समोर असणाऱ्या मनपा उद्यान जवळ पुलावरील सेगमेंट लॉन्चिंगचे करण्यात येणार आहे. यासाठी सेंगमेंन्ट लॉन्चिग करण्यासाठी सेक्टर १७ जामा मशिद ते श्रीराम विदयालयाकडे जाणारा वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने हिरवा कंदील दिला असून हा रस्ता ३ मे ते १ जून रात्री १२ पर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

याला पर्यायी मार्ग देण्यात आला असून पटनी मार्गावरून सेक्टर ३ दिशेने जाणारी वाहने, जामा मशिद येथून उजवीकडे वळण घेवून, सेक्टर १७ दत्त मंदिर समोरील मार्गाने पुढे जाऊ शकतात.

विरूद्ध दिशेच्या वाहतुकीचा विचार करता भारत बिजली येथून सेक्टर ३ येथील श्रीराम विद्यालय कडे येणारी वाहने डावीकडे वळण घेवून, ऐरोली सेक्टर ५ येथील मार्गाचा वापर वाहन चालक करू शकतात. सर्व प्रकारच्या वाहनासाठी हि अधिसूचना लागू असली तर कंत्राटदार जे कुमार इन्फा प्रोजेक्ट लिमीटेड यांची वाहने येथून ये जा करू शकतात.